१० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येपासून व्यक्तीला परावृत्त करणे महत्त्वाचे असून, आत्महत्येतील प्रकार लक्षात घेण्याची गरज असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. जीवन संपविण्याचा नकारात्मक विचार मनात सतत घोळत  राहिल्यानंतर थेट आत्महत्या केली जाते, हा एक प्रकार आहे. तर काही जण इतरांचे केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी जीविताला हानी होणार नाही, हे लक्षात घेऊन आत्महत्येचा फक्त प्रयत्न  करतात हा दुसरा प्रकार आहे . दोन्ही प्रकारांतील गांभीर्य ओळखणे गरजेचे असून, प्रयत्न करणारी आणि खरंच जीवनाला वैतागलेली व्यक्ती लक्षात घेणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत कुटुंबातील, मित्रांतील, आप्तेष्टांतील संवाद कमी होत असून, अपुऱ्या संवादामुळे नैराश्य वाढत असलेल्या रुग्णांमध्ये सध्या वाढ होत आहे.

‘‘प्रत्येक आत्महत्या करणारी व्यक्ती काही तिला जगायचं नसतं म्हणून हे पाऊल उचलत नाही. बहुतेक व्यक्तींना असं वाटतं, की आपली जी काही समस्या आहे ती सुटू शकणार नाही. आत्महत्या केली की आपल्याबरोबरच ती समस्याही संपेल, या विचारांमुळे या व्यक्ती आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतात, पण.. तो निर्णय थांबू शकतो, तुम्ही ‘ऐकू’ लागलात तर..’’ 

स्पर्धात्मक जगात टिकाव लागावा म्हणून आज जो तो प्रयत्न करतोय. आधुनिक जगात कोणी कॉर्पोरेट आयुष्यात यश मिळवण्यासाठी पळतेय, तर कोणी प्रेमाला नवा आयाम देण्यासाठी झगडत आहे. पण हे सगळे करताना आनंदी आयुष्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या बदलल्या आहेत. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तशाच याच्याही दोन बाजू. एक म्हणजे यश आणि दुसरे अपयश. यशाचा मार्ग सर्वांना हवाहवासा असतो, पण अपयश पचवता न आल्याने आत्महत्या हा मार्ग स्वीकारला जातो. यातून बाहेर काढण्यासाठी आज अनेक होतकरू तरुण आणि संस्था मदतीला धावून येत आहेत. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मदतीला तत्पर असलेल्या संस्थाविषयी माहिती, आकडेवारी आणि अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे.

       आत्महत्यामागील मानसिकता समजून घेण्यासाठी ही वर्तनाची गटवारी समजून घेणे गरजेचे आहे. ‘टू बी ऑर नॉट टू बी ’ प्रमाणे वर्तनाची गटवारी करता येते. ‘टू बी’ या गटातील रुग्णाची मानसिकता स्वत:ला संपवून टाकण्याची नसते. पण मनाविरुद्ध घडले की, बंड पुकारण्यासाठी या गटातील मनोरुग्ण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. दुसरा गट म्हणजे ‘नॉट टू बी’. या गटातील लोक नैराश्याच्या गर्तेत अडकलेले असतात आणि सगळे काही संपवून टाकण्यासाठी ते योजनापूर्ण प्रयत्न करत असतात.

       आपल्या मनासारखे घडले नाही की विरोध करणे किंवा काही टोकाची पावले उचलणे हा मानवी स्वभाव आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे मानसिक प्रतिकारशक्ती वाढवणे. प्रेमभंगामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी एकच विचार मनात ठेवायचा, नातेसंबंध हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. पण केवळ एक नाते म्हणजे जीवन नाही, ज्यासाठी आपण आपले आयुष्य संपवावे. तसेच दिवसागणिक स्पर्धा वाढणार आहे. त्यात उतरायचे की नाही हे आपल्यावर असते. उतरायचे तर पूर्ण तयारीनिशी. पण अपयश पचवण्याची ताकदही असली पाहिजे.

           पालक आणि पाल्यामधील संवादाची दरी ही खरी समस्या आहे. पाल्य कोणत्या समस्यांना सामोरा जात आहे का? याची माहिती पालकांना असावी. त्याशिवाय इतर कौटुंबिक मतभेदापासून पाल्याला शक्यतो लांब ठेवा. तसेच आजकालचे पालक पाल्यांना वास्तवापासून दूर ठेवतात. ही मुले अभासी जगाला वास्तव समजून तशी वागू लागतात. असे न करता वेळोवेळी वास्तवाची ओळख पाल्याला करून देणे गरजेचे आहे. त्याशिवाय पाल्याशी जास्तीत जास्त मनमोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

      कुटुंबातील एक व्यक्ती आत्महत्या करून जीवनयात्रा संपवतो मात्र मागे राहिलेल्या कुटुंब कबिल्याची अवस्था दयनीय होते. आख्ख कुटुंब उद्धवस्त होतं. कुटुंबातील एकमेव आधार असलेली कमवती व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा त्यांच्यवर आवलंबून असणाऱ्या इतरांची अवस्था मेल्याहून मेल्यसारखी होते. जेव्हा कुटुंबाच भावी आधारस्तंभ आत्महत्या करतो , तेव्हा त्यांच्या मुलाबाळांना जिवंतपणी यातना भोगाव्या लागतात . त्यामुळे अश्या  मुलाच्या  लहानपणीच आपल्या डोक्यावारील मायेचं छत्र हरपलं जात आणी ते छत्र नसल्यची उणीव भासू नये म्हणून अनाथ आश्रमात जाव लागत . हे सर्वच वेळीत थांबवावे लागेल यासाठी कुटुंबातील व्यक्तिंचा एकमेकांतील सुसंवाद वाढवावा लागेल . एकमेकांच्या सुखदुखाच्या गोष्टी मांडल्या पाहिजेत तेव्हा मन मोकळे होईल आणी आत्महत्या सारख्या गोष्टीना आळा बसेल .

        हलतो सें हारे, वक्त के मारे
     तुम भले ही दुनिया को लगो बेचारे
           मगर जिंदगी की डोर को
     ना छोडना “आत्महत्या“ के सहारे.....

श्रेय,
श्रद्धा राजेंद्र भागवत (पुणे)

Leave a Reply